दरम्यान, सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्यामुळे दोन एसटी बससोबत अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. यात जवळपास 42 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेनं सरकारी यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. ब्रिटीशकालीन पूल असल्यानं या पुलाची योग्य काळजी का घेण्यात आली नाही? असा सवालही तेव्हा नागरिकांकडून विचारण्यात येत होता. मात्र, आता या दुर्घटनेबाबत आयआयटी मुंबईचा हा अहवाल महत्वपूर्ण ठरणार आहे.
ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला होता. या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले होते. यामधील 28 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं.
या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.
महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश होता.
साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.