मुंबई: संजय राऊतांचे वर्तन एका खासदाराला शोभणारं नाही. कायद्याच्या राज्याची अंमलबजावणी करायची सोडून आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर याचिकाकर्तीला (कंगना रनौत) धडा शिकवण्यासाठी करण्यात आला अशा शब्दात उच्च न्यायालयाने संजय राऊत यांचा समाचार घेतला.


मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला लक्ष केल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊतना खडे बोल सुनावले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्याने कंगना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यादरम्यान प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तसेच क्या होता है कानून? अशा प्रकारचं वक्तव्य केलं होत. या वक्तव्याची नोंद घेत न्यायालयानं संजय राऊत यांना फटकारलं आहे.


कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने बुलडोजर चालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर 'उखाड दिया' या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली होती. त्याचीही नोंद उच्च न्यायालयाने घेतली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्याने अशी प्रकारचे वक्तव्य आपल्याकडून झाल्याचे संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं.


मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करताना अभिनेत्री कंगनानं केलेली विधानं ही चुकीचीच होती, त्याचं समर्थन करता येणार नाही असं स्पष्ट करत भविष्यात तिला अश्याप्रकारची वक्तव्य करताना भान बाळगण्याची समज उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच नागरिकांनी केलेल्या टिकांकडे सरकारनं दुर्लक्ष करावं, त्यासाठी सत्तेचा वापर करत नागरिकांचे मुलभूत अधिकार डावलणं चुकीचं असल्याचं मत उच्च न्यायालयानं या निकालात नोंदवलं आहे.


महत्वाच्या बातम्या: