मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यावरची पुढची सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे हा संप आता पुढचा महिनाभर सुरु राहतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. 


एसटी संपाबाबत आज न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू होत आहेत. मग यावेळी खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. एसटी कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय याचाही विचार करावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.


संपकाळात कामावर येऊ इच्छिणा-या कामगारांना संपकऱ्यांनी आडकाठी केली जात आहे असं राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं. मात्र अशी घटना घडल्याचं संपकरी कामगार संघटनेनं नाकारलं आहे. आता यावर पुढच्या महिन्यात, 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 


एसटी संपात (ST Strike) नक्षलवादी चळवळीचा (Naxal) शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात (High Court) याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला. गुणरत्न सदावर्ते न्यायमूर्तींना म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत.  त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या"  


दरम्यान आजच्या सुनावणीत सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. "प्रत्येक संपकरी संघटना स्वतंत्रपणे समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत", असं राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आलं.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Maj