Maharashtra Mumbai Rain Update LIVE: रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड जिल्हातील शाळांनाही सुट्टी

Mumbai Thane Rain Blog LIVE : मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगर आणि ठाण्यातील विविध भागात पाणी साचलंय, ज्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

ज्योती देवरे Last Updated: 08 Jul 2024 10:33 PM
Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पावसाचे पाणी, वाहतूक संथ गतीने सुरू

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पावसाचे पाणी भरल्याने लोकल वाहतूक विस्कळित, अप आणि डाऊन दिशेची वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू.

Mumbai Local Train Service Update : ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी, ठाण्यातून कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

मुसळधार पावसाचा जोर ओसरल्यानंतर लोकल वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. ठाण्यातून कल्याणकडे जाणाऱ्या स्लो लोकल सुरळीत झाल्या आहेत, मात्र जलद लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. ठाण्याहून सुटणाऱ्या कर्जत, कसारा ट्रेन रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे नोकरदारवर्गांना कामावरून घरी जाताना परतीच्या प्रवासत सायंकाळी देखील फटका बसल्याचं दिसतंय. ठाण्यातील फलाट क्रमांक 1 वर पाणी साचल्यामुळे सीएसटीला सुटणाऱ्या ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वळवण्यात येत आहेत. 

गुहागर मध्ये पावसाचे थैमान, नागरी वसाहतीला पाण्याचा वेढा

गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचले आहे.  पावसाचा जोर वाढल्याने गुहागरची मुख्य बाजारपेठ असलेली शृंगारतळी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर गुहागर विजापूर मार्गावर देखील प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गुहागरमधील जनजीवनावर अधिक प्रभाव होण्याची शक्यता आहे.

पुण्यात पावसाला सुरुवात, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाला सुरुवात झालीये. पुढील तीन दिवस पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

पुण्यात पावसाला सुरुवात, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाला सुरुवात झालीये. पुढील तीन दिवस पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

पुण्यात पावसाला सुरुवात, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाला सुरुवात झालीये. पुढील तीन दिवस पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात, पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट

पुणे


 पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात


डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाळा सुरुवात 


पुण्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज


घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता; पर्यटकांना सतर्कतेचा  इशारा

Mumbai Rain Update : पाणी ओसरल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू

कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु 


स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू 


तर चुनाभट्टी येथील पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू 


सी एस एम टी ते ठाणे, ठाणे ते कर्जत, कसारा वाहतूक सुरू 


पनवेल ते सी एस एम टी ही वाहतूक देखील सुरू


तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरू असून थोड्या उशिराने आहे.

Mumbai Rain : मुंबईत 6 तासांमध्ये 300 मिमी पाऊस

Raigad Rain : रायगडमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरूच, अलिबाग तालुक्यातील अनेक गावांत पाणी

काल रात्री पासून सतत पडत असलेल्या मुसळधार पाऊसाने अलिबाग तालुक्यातील मल्याण, बोरघर, रामराज, भिलजी इत्यादी गावातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे  कपडे, राशन इत्यादी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ खूप भयभीत झालेत झाले होते. हे सर्व लक्षात घेऊन स्थानिक आमदार महेंद्र  दळवी यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून मल्याण, बोरघर, रामराज, भिलजी इत्यादी. गावात पावसामुळे झालेला नुकसानाचा पंचनामा करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई भरून देण्याची हमी दिली आहे. त्यावेळी आमदार यांच्या पत्नी मानसी दळवी, यांनी देखील स्वतः घटनास्थळी जाऊन कुटुंबांना धीर दिला

Mumbai Rain : दक्षिण मुंबईमध्ये एक तासापासून मुसळधार पाऊस

Mumbai Rain : दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे, 
याला एक तासापासून सलग पाऊस सुरू आहे 
गेटवे ऑफ इंडिया येथे असलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले आहे, 
समुद्राच्या बाजूने रस्सी बांधून पर्यटकांना समुद्र जवळ येण्यापासून थांबवले जात आहे 
तसेच क्लाऊड स्पीकर वरून सर्व पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत

Konkan Rain : कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी

Konkan Rain : कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता


रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज


पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज


उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा, ५०-६० किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज

Mumbai Rain : पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला,

Mumbai Rain : पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला


१८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव


या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.


५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते.


गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे,


अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Raigad Rain : आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपले

Raigad Rain : रायगड जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले,


आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी कऱण्यात आले असुन जिल्हा प्रशासन सज्ज आहे


महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या किल्ले रायगडवाडी येथील युवक काल दुपारी किल्ले रायगडाच्या शेजारी असणाऱ्या धबधब्यावरून वाहुन गेला  त्यांनंतर जिल्हयात पुन्हा एकदा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय 

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 215 मी. मी. पावसाची नोंद, जिल्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 215 मी. मी. पावसाची नोंद


सिंधुदुर्गात काल ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. अ


नेक घरांना पुराच्या पाण्याने वेडलं. मुंबई गोवा महामार्गावर देखील पाणी आल्याने महामार्ग तब्बल 14 तास बंद होता.


जिल्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या वर सध्या वाहत असून पूरस्थिती कायम आहे.


मात्र गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात 305 मी.मी. पावसाची नोंद झाली.


तर कुडाळ मध्ये २३५, मालवण मध्ये २१४, कणकवली १९३, सावंतवाडी १८३, वैभववाडी १८५, देवगड १९८ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे

Nashik Rain : रेल्वेसेवा विस्कळित झाल्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

Nashik Rain : रेल्वेसेवा विस्कळित झाल्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी.


सकाळपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणारे प्रवासी आणि नाशिकहून जळगाव भुसावळ कडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर बसून रेल्वेची वाट बघावी लागत आहे.


दैनंदिन कामासाठी आणि नोकरदारांसाठी रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने मोठा फटका बसतोय तर,


लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच बसून रेल्वेची वाट बघावी लागत आहे.


रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांकडून सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात 

Shahapur :शहापूर कसारा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

Shahapur : काल शहापूर कसारा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले होते , त्याचे पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात येत आहे

Raigad Rain : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज रोजीपासून रायगड किल्ला पर्यटक तसेच शिवभक्त यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे.


रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून  बंद करण्यात  आला आहे .


पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.


तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे.


रोप वे प्रशासनाकडून रोपवे ने किल्ल्यावर जाण्यासाठी  बंद करण्यात आला आहे.

Nashik Rain - मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना फटका, रेल्वे अर्धा  ते एक तास उशीरा, प्रवाशांची तारांबळ

Nashik Rain - मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाश्यांना फटका...


- नाशिकहून मुंबई जाणाऱ्या रेल्वे अर्धा  ते एक तास उशिरा...


- तर मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिरा असल्याने प्रवाशांची तारांबळ...


- नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी...
 
- मुंबईहून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळित...


- रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांना करावा लागतोय प्रचंड मनस्ताप

Mumbai Rain Update : बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनच्या गर्दीत महिलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली, अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला.

Mumbai Rain Update : पनवेल वरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली.


तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला.


त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली.


मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला.


पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.


 


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते, त्यामुळे हार्बरवर अनेक परेल्वे उशिराने धावत होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीत महीलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसामुळे कुठे शॉर्टसर्किट, कुठे झाडे पडली? कुठे दरड कोसळली?

Mumbai Rain Update : पाऊस मुंबई अपडेट 


शॉर्टसर्किट - 


पूर्व उपनगरात ०९ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. 


झाडे / फांदया पडण्याच्या तक्रारी: 


शहरात १२, पूर्व उपनगरात ०८ व पश्चिम उपनगरात १९


अशा एकूण ३९ ठिकाणी झाडे/फांदया पडण्याच्या तक्रारी नागरीकांकडून प्राप्त झाल्या. सदर तक्रारी पडताळणी करिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु आहे.


भिंत / घर घराचा भाग पडणे : 


पूर्व उपनगरात ०१ ठिकाणी घराचा काही भाग पडल्याची तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रार संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.


दरड कोसळणे: 


दि.०८.०७.२०२४ रोजी सकाळी ०७:०६ वा. पोलिस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार विक्रोळी पार्क साईट, सोमेश्वर मंदिरजवळ, विक्रोळी (पू) येथे डोंगरावरील माती घरसल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे काम चालू आहे.

Rain Update : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक, धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले

Rain Update : महाराष्ट्र सह मध्यप्रदेशात होत असलेल्या दमदार पावसाने तापी नदी वरील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक


हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले


त्यातून 19105 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय


अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार असल्याने


दरवाजे उघडण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस जास्त झाल्यानं, जे पंप बसवले होते ते फारसे उपयोगी ठरले नाहीत - राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

Mumbai Rain Update : कालपासून जोरदार पाऊस पडतोय - राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील


गेल्या 3-4 तासांत 300 मीमी. पेक्षा जास्त पाऊस झाला


कुर्ला, चुनाभट्टी परिसरात अधिक समस्या आहे, मिठी नदीच पाणीही वाढलं होतं


मात्र प्रशासन कालपासूनच सज्ज होत


आता हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झालीय


शाळांना आज सुट्टी दिलेली आहे


पाऊस जास्त झाल्यानं जे पंप बसवले होते तेही फारसे उपयोगी ठरले नाहीत


पण सगळे पंप सुरू होते, नालेसफाई योग्य झालीय, म्हणून इतका पाऊस होऊनही पाणी इतक्या लवकर कमी झालं


रेल्वे, नेव्ही, एनडीआरएफ यांचीही संयुक्त बैठक झालेली आहे

Sindhudurg Rain : तळकोकणात मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीम कुडाळ मध्ये दाखल

Sindhudurg Rain : तळकोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची टीम कुडाळ मध्ये दाखल झाली आहे.


त्याठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी पावशी गावात गेली आहे.


NDRF चे मदत सुरू झालं असून कुडाळ तहसीलदार देखील या ठिकाणी मदत कार्याची पाहणी करत आहेत.


बांदा, कुडाळ येथे NDRF ची टीम मदतकार्य करणार आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका विमान फेऱ्यांवर, आमदार अडकले नागपूर विमानतळावर

Mumbai Rain Update : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूर ते मुंबई विमान फेऱ्यांवर ...


विधिमंडळाच्या कामकाजाला सकाळी नागपूरवरून मुंबईला जाणारे आमदार अडकले नागपूर विमानतळावर ...

Mumbai Rain Update : पावसामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत; मानखुर्द ते CSMT लोकल ठप्प

Mumbai Rain Update : हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत; मानखुर्द ते CSMT लोकल ठप्प


पनवेल- मानखुर्द लोकल 40-50 मिनिट उशिराने


गरज असल्यास बाहेर बाहेर पडा- राल्वेचे आवाहन

Raigad Rain : रायगडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसात लोणेरे श्रीवर्धन रस्त्यावर झाड कोसळल्याने राज्य महामार्ग बंद 

Raigad Rain : रायगडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसात लोणेरे श्रीवर्धन रस्त्यावर झाड कोसळल्याने राज्य महामार्ग बंद 


लोणेरे कडून श्रीवर्धन हरिहरेश्वर म्हसळा  कडे जाणारी वाहतूक बंद 



पर्यायी वाहतुकीसाठी गोरेगाव माणगाव मोरबे मार्गे म्हसळा कडे येण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर

Buldhana Rain : बुलढाण्यात गारडगावला पुराचा वेढा, पुरात बापलेक अडकले

Buldhana : बुलढाण्यात गारडगावला पुराचा वेढा, पुरात बापलेक अडकले..


आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली दखल, पोकलँड च्या साहाय्याने काढले बाहेर....


ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना...

Mumbai Rain Update : कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस अखेर चार तासांनी रवाना

Mumbai Rain Update : कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस चार तासांनी रवाना


कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस सकाळी सात वाजल्यापासून अंबरनाथ स्टेशन जवळ थांबून होती


एक एक्सप्रेस मधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले


अखेर चार तासानंतर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ वरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे

Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ यांना फटका

Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ यांना फटका


कल्याणमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबून राहिली


मंत्री हसन मुश्रीफ मित्राच्या गाडीतून विधानभवनाकडे रवाना


कल्याणमध्ये मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून उतरले

Mumbai Rain Update :  मुंबईचा पावसाचा फटका नेतेमंडळीना ही बसला

Mumbai Rain Update :  मुंबईचा पावसाचा फटका नेतेमंडळीनाही बसला आहे.


मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना कुर्ला पोलिसांच्या बिट चौकीत काढावे लागले आहे.


तर काही अंतर रेल्वे रुळावरुन पार करावे लागले आहे.


सिधेश्वरी एक्सप्रेस ने ही नेतेमंडळी मुंबईकडे येत होती. या वेळी लोकल विद्याविहार च्या पुढे जाईना,


त्यामुळे हे दोघे ही रेल्वेतून उतरले आणि त्यानी कुर्ला रेल्वे स्थानक गाठले.


तिथे खूप वेळ बसल्यानंतर आता ते पोलीस वाहनातून मुंबईकडे रवाना झाले

Kolhapur : कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी वाढली

Kolhapur : कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी वाढली


पंचगंगा नदी सध्या 33 फुटांवरून वाहते तर जिल्ह्यातील 56 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर पाऊस वाढला, पुन्हा रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, 17 एक्सप्रेस-लोकल विविध ठिकाणी अडकल्या

Mumbai Rain Update : पाऊस वाढला आणि मोठी भरती असेल तर पुन्हा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता


कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे रुलांच्या वर पाणी असल्याने मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे, 


विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान फास्ट अप आणि डाऊन वर पाणी आहे


यामुळेच 17 मेल एक्सप्रेस लोकल या विविध ठिकाणी अडकून पडल्या आहेत, 


त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस देखील आहे, 



जोपर्यंत फास्ट ट्रॅक सर होत नाही तोपर्यंत या गाड्या निघणे मुश्किल आहे

Mumbai Rain : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये  सद्यस्थितीत  १८.७३ % पाणीसाठा

Mumbai Rain : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये  सद्यस्थितीत  १८.७३ % पाणीसाठा


 धरण क्षेत्रात मागील दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे  पाणीसाठ्यात सात ते आठ टक्क्यांनी वाढ


२, ७१,१४७ दशलक्ष लिटर पाणीसाठा  सध्या उपलब्ध


 दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अजूनही पाच ते सात टक्के पाणीसाठा  कमी

Raigad Rain : रायगड मधील मुरूड अलिबाग तालुक्यातील शाळांना सुट्टी, शिक्षणाधिकारी यांचें आदेश 

Raigad Rain : रायगड मधील मुरूड अलिबाग तालुक्यातील शाळांना सुट्टी 


शिक्षणाधिकारी यांचें आदेश 


काळ झालेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय 


रायगड जिल्ह्याला काल रेड अलर्ट जाहीर करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आज रायगड जिल्ह्यातल्या मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे 



अलिबाग मुरुड तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना सुट्टी जाहिर

Parbhani Rain : परभणीच्या पालम तालुक्यात रात्री जोरदार पाऊस, गळाटी नदीला पूर, 5 गावांचा संपर्क तुटला 

Parbhani Rain : परभणीच्या पालम तालुक्यात रात्री जोरदार पाऊस, गळाटी नदीला पूर, 5 गावांचा संपर्क तुटला 


परभणीच्या पालम तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झालाय ज्यामुळे पालम ते जांभुळ बेट रस्त्यावर असलेल्या गळाटी नदीला पूर आला आहे त्यामुळे या भागातील फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या पाच गावाचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने वेळेत काम न केल्याने ही स्थिती ओढवली आहे.तात्पुरता वाहतूक करण्यासाठी सिमेंट नळी टाकून  तयार केलेला पुल पाण्याखाली गेला आहे. दिवस भर हा रस्ता वाहतूक करण्यासाठी बंद राहणार आहे.

Akola Rain : अकोल्यात 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत

Akola Rain : अकोल्यात 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत झालंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरून वाहनं चालवतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. महापालिकेनं केलेलं नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय.

Mumbai Rain Update : मुंबईतील पावसात रेल्वे वाहतूक थांबल्याचा फटका अनेक मंत्री आणि आमदारांना बसला

Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाचा रेल्वेला फटका.


अनेक रेल्वे गाड्या मधातच थांबवाव्या लागल्यात.


दादर आणि कुर्ला स्टेशनदरम्यान पावसामुळे रेल्वे वाहतूक थांबल्याचा फटका अनेक मंत्री आणि आमदारांना बसला.


मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरींना करावा लागला रेल्वे ट्रॅकने प्रवास

Akola Rain : अकोला मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाची आवार भिंत कोसळली

Akola Rain : काही दिवसापूर्वीच आकोट अकोला महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला पुल खचला होता.. आता पुन्हा या मार्गावरील चोहोट्टा बाजार आणि करोडी फाटा नदीच्या पुलावरील आधार भिंती अक्षरशः पहिल्या पावसात कोसळली आहे.. या पुलाला बांधकामाला काही महिनेच उलटले आहे. नुकत्याच कालच्या आणि आजच्या पावसामुळे अकोट अकोला मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाची आवार भिंत कोसळली आहे.

Mumbai Rain Update :  मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज

Mumbai Rain Update : मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे.  



आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबईत आपत्कालीन कर्मचारी व अधिकारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.


महानगरपालिकेचे सर्व उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच इतर सर्व यंत्रणा विविध ठिकाणी कार्यरत असून, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे.


नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास न ठेवता आपतकालीन परिस्थितीत  तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Mumbai Rain Update :  नवी मुंबईत हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत, वाशी पासून सीएसएसटीला जाणारी रेल्वे बंद, सायन - पनवेल हायवेवर गर्दी

Mumbai Rain Update :  नवी मुंबईत हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत


पनवेल ते वाशी मार्ग सुरू 


वाशी पासून सीएसएसटीला जाणारी रेल्वे बंद


मुंबईला जाण्यासाठी वाशीवरून ठाणे ला लोकांचा प्रवास


हार्बर लाईन विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांचा सायन - पनवेल हायवेवर गर्दी


मिळेल ते वाहन पकडून मुंबईत जाण्यासाठी रस्त्यावर उभे


टॅक्सी , रिक्षा , बस साठी गर्दी


नवी मुंबई परिवहनच्या बसने मुंबईत जाण्यासाठी बस स्टॅापवरही रांग

Mumbai Rain Update : मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस, दुरांतो एक्स्प्रेस सुमारे पाच तास उशिराने धावतायत

आहे...


दोन्ही गाड्या काल मुंबईतूनच उशिरा निघाल्या होत्या...


 मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या पावसाचा फटका

Mumbai Rain Update : मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यापीठाकडून नोटीस जारी

Mumbai Rain Update : मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (आयडॉल ) ज्या परीक्षा सकाळच्या सत्रात होत्या


त्या परीक्षा मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत


आजच्या सर्व परीक्षा 13 जुलै रोजी होणार असल्याचा मुंबई विद्यापीठाने नोटीस जारी करत सांगितले आहेत

Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला देखील फटका, रेल्वे वाहतूक 10 मिनिटे उशिराने

Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला देखील फटका, 


माटुंगा रोड आणि दादर दरम्यान पाण्याची पातळी रेल्वे रुळंच्या वर पोचल्याने वाहतूक 10 मिनिटे उशिराने

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही 20 ते 25 मिनिटे उशिराने, प्रवाशांनी रस्ते मार्गाचा पर्याय निवडला

Mumbai Rain Update : मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही 20 ते 25 मिनिटे उशिराने.


सकाळच्या वेळी कामाला जाण्यासाठी निघालेल्या ठाणेकरांनी रस्ते मार्गाचा पर्याय निवडला आहे 



 खाजगी वाहनांनी  मुंबईच्या दिशेने जात असताना ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्याजवळ वाहतूक संथ गतीने मार्गस्थ होतेय



 त्यामुळे कामाला जायला निघायला ठाणे करांना इथे सुद्धा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. 

Mumbai Rain Update : महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ स्थानकात 2 तासांपासून उभी, प्रवाशांचे हाल

Mumbai Rain Update : महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ स्थानकात 2 तासांपासून उभी 


मुंबईकडे येणारी वाहतूक सकाळी ठप्प होती त्यामुळे अनेक मेल एक्सप्रेस आणि लोकल कल्याण ते कर्जत कसारा स्थानकादरम्यान अडकून आहेत 


पुढील मार्गिका क्लिअर होत नाही तोपर्यंत या एक्सप्रेस गाड्या सुटणार नाहीत 


मात्र ट्रेन मधील पाणी आणि इतर गोष्टी संपल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

Akola Rain : अकोल्यात मुसळधार पावसामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया रद्द, प्रक्रियेत काहीसा बदल

Akola Rain : अकोल्यात काल रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाउसामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलीय.


या भरती प्रक्रियेत काहिसा बदल झालाय.


आज 8 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आता पुढं 11 जुलै रोजी असणार आहे.


आज 8 जुलै रोजी तब्बल 1 हजार 154 महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी होणार होती,


पावसामुळ ही मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे.


त्यामुळ या मैदानी चाचणीसाठी तारीख 11 जुलै रोजी ठरली आहे.

Mumbai Rain Update : कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली, प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Rain Update : कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली


मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी


सकाळपासून एक्स्प्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे जलमय, पहाटेपासून दुसऱ्यांदा सबवे वाहतुकीसाठी बंद 

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे जलमय, पहाटेपासून दुसऱ्यांदा सब वे वाहतुकीसाठी बंद 


मुंबईत पहाटेपासूनच मतदार पाऊस कोसळत असून परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.


अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला असून सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


सबवे मध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. 

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिमेकडील अंबोली झोपडपट्टीतील घरात घुसले पाणी

Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिमेकडील अंबोली झोपडपट्टीतील घरात घुसले पाणी


मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.


अनेक सखल भागात पाणी देखील साचल्याच पाहायला मिळतात मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली सिजर रोड परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे.


यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याच दिसून आले.


जोरदार पावसामुळे झोपडपट्टीतील गटारे उन्मळून वाहू लागले याच गटाराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे


घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले असून यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे.

Shahapur : शहापूर तालुक्यात काल झालेल्या पावसाने धरण क्षेत्रातील पाणीपातळी मध्ये वाढ

Shahapur : शहापूर तालुक्यात काल झालेल्या पावसाने धरण क्षेत्रच्या पाणीपातळी मध्ये वाढ


  भातसा धरणक्षेत्रात सर्वात जास्त म्हणजेच 247 मिलिमीटर  पावसाची नोंद करण्यात आली.


तानसा 60 मिलिमीटर तर मोडकसागर 80 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त पाऊस झाल्याने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी 


धरणा क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ

Pune : मुंबईत मुसळधार पावसामुळे पुण्यातील रेल्वे रद्द, पुण्यावरून प्रगती एक्स्प्रेस निघताच प्रवाशांकडून गणपतीची आरती सुरू

Pune : मुंबईत मुसळधार पावसामुळे पुण्यात सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस रद्द


पुण्यावरून 7.50 ची प्रगती एक्स्प्रेस 8.23 ला निघताच 


सिंहगड आणि डेक्कन क्वीन च्या प्रवाश्यांनी प्रगती सुटताच गणपतीची आरती सुरू केली

Mumbai Rain Update : मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वाधिक पाऊस कुठे झाला? विविध भागातील पावसाचे प्रमाण जाणून घ्या

Mumbai Rain Update : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.


 


- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)


- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)


- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)


- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)


- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)


- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)


- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)


- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)


- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)


- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)


- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)


- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)


- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)


- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)


- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)

Mumbai Rain Update : पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा 

Mumbai Rain Update : पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा 


पुढील 3 तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज 


मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील 24 तासात काही भागात अतिवृष्टी


 तर  मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा

Akola : अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रभर धुवांधार पाऊस, सखल भागात पावसाचं पाणी साचलं

Akola : अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रभर धुवांधार पाऊस झालाय.


अकोला शहरातील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलंय.


अकोला शहरातील डाबकी रोड भागातील शिवाजीनगरमध्ये अनेक घरांत पावसाचं पाणी घुसलंय.


पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांचा जलस्तर वाढलाय.

Karjat : पावसाचे पाणी कर्जत रेल्वे स्थानकात अद्याप कायम, सर्व लोकल ट्रेन ठाणे स्टेशन पर्यंत चालवण्यात येतायत

Karjat : पावसाचे पाणी कर्जत रेल्वे स्थानकात अद्याप कायम असल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन ठाणे स्टेशन पर्यंत चालवण्यात येत आहे.


कृपया ट्रेनचा प्रवास करण्यापूर्वी चौकशी करून प्रवास करावा अशी सुचना व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे.


रेल्वे कडून सुध्दा सांगण्यात येत आहे ही मेल आत्ता नांदेड पनवेल मार्गे जाणार आहे


ज्या ज्या प्रवासांना मुंबई दिशेनी जायचं आहे, त्यांनी या एक्सप्रेस मेल मधून प्रवास करा


अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

Raigad Rain Update : कर्जत - रायगडात काल मुसळधार पाऊस, कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या बंद

Raigad Rain Update : कर्जत - रायगडात काल मुसळधार पाऊस कोसळला


रात्रभर हा पाऊस कोसळत होता, त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे प्रकार पाहायला मिळालं


कर्जत रेल्वे स्थानकावर देखील रेल्वे रुळांवर आणि स्थानकांमध्ये पाणी साचलंय त्यामुळे येथील रेल्वे गाड्या बंद 


प्रवाशांचा मात्र कोळंबा झाल्याचे चित्र आहे.


एकंदरीत पाणी ओसरल्यानंतर रेल्वे सेवा सुरू होण्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे


कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत


त्यामुळे साचलेलं पावसाचं पाणी ओसरण्याचे आता प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, अनेक सखल भागात पाणी साचलं

Mumbai Rain Update : मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली 


मुंबईसह उपनगरात उपनगरात पहाटे पासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे


यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे


अंधेरीतील सबवे मध्ये देखील तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे


अंधेरी सबवे हा देखील वाहनचालकांसाठी बंद करण्यात आलेला आहे


वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले


महापालिकेचे आपत्ती नियंत्रण विभागाकडून या ठिकाणी सभेतील पाणी उपसण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे

Mumbai Rain Update : मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai Rain Update : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.


काही सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले


उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.


आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच


महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 


पहिल्या ( सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये


तर पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे काही रेल्वे रद्द, रेल्वेरुळावर साचलं पाणी, जाणून घ्या

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे काही रेल्वे रद्द, रेल्वेरुळावर साचलं पाणी


Due to WATER LOGGING at Various Station in Mumbai División on 08.07.24.


FOLLOWING TRAINS ARE CANCELLED :-
1) 12110 (MMR-CSMT) JCO 08.07.2024 
2) 11010 (PUNE-CSMT) JCO 08.07.2024
3) 12124 (PUNE CSMT DECCAN QUEEN) JCO 08.07.2024
4) 11007 (CSMT - PUNE DECCAN) JCO 08.07.2024
5) 12127 (CSMT-PUNE INTERCITY EXP) JCO 08.07.2024

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारपासून संततधार पाऊस सुरू, पिकांना नुकसान होण्याचा शक्यता

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारपासून संततधार पाऊस सुरू आहे


तर अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला


त्यामुळे नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना नुकसान होण्याचा शक्यता आहे


अनेक शेतात पावसाचे पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत


जिल्ह्यातील तेराही तालुक्यात रात्रभर संततधार पाऊस पडला तर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला 

Goa Rain Update : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा दरड कोसळली, वाहतूक पेडणे शहरातून वळवली

Goa Rain Update : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील मालपे पेडणे भागात पुन्हा दरड कोसळली.


दरडी सह संरक्षक भिंत कोसळल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पेडणे शहरातून  वळवली.


मालपे- पेडणे घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरून होणारी वाहतूक वळविली आहे. 


मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोकल गाड्यांवर परिणाम, कर्जत कसारा मार्गावरील लोकल दीड तास उशिराने

Mumbai Rain Update : मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे



मुंबईकडे जाणाऱ्या लोकल एक तास उशिराने धावत आहेत तर कर्जत कसारा या मार्गावर जाणाऱ्या लोकल दीड तास उशिराने धावत आहेत 



लोकल उशिरा धावत असल्याने स्टेशनवर उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे



त्याच प्रमाणे काही लोकल रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात येत आहेत

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाची बॅटींग, आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची हवामान विभागाची माहिती

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे.


सिंधुदुर्गातील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून नद्या पात्राबाहेर वाहत आहेत.


त्यामुळे अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले तर भातशेती पाण्याखाली गेली आहे.


जिल्ह्यात आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.


जिल्यातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. वैभववाडी मधील तीथवली येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळलं.


कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीच्या पुराच्या पाण्यात रस्ता उखरून खड्डा पडल्याने २७ गावांचा संपर्क तुटला.


दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे पुलावर पाणी आलं असतानाही बोलेरो गाडी घातल्याने तिघे जण वाहून गेले होते,


रात्री त्यांना स्थानिक आणि प्रशासनाने सुखरूप बाहेर काढलं.

Mumbai Rain Update : ठाणे रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे ट्रेन पुन्हा सुरू झाल्या, ट्रेन 10 ते 15  मिनिटांनी उशिराने धावतायत

#MumbaiRain : मध्यरात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेला जोरदार फटका बसला होता...


कल्याण ,डोंबिवली,दिवा येथून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंतच मध्य रेल्वे सुरू होती...


आता ठाणे रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे ट्रेन पुन्हा सुरू झाल्या आहेत...


ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मात्र गर्दी दिसून येत आहे.


सध्या ट्रेन 10 ते 15  मिनिटांनी उशिराने आहे.

Kolhapur Rain : कोल्हापूर शहरात पावसाची विश्रांती, मात्र घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Kolhapur Rain : कोल्हापूर शहरात पावसाची विश्रांती, मात्र घाटमाथ्यावर जोरदार पाऊस


पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंच इतकी


एका दिवसात पाणी पातळी 3 फुटांनी वाढली


जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक टाळण्याचं आवाहन

Sindhudurg : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प

Sindhudurg : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या १२ तासांपासून ठप्प.


सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प. 


कुडाळ मधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग ठप्प.


कर्ली नदीला पूर आल्याने महामार्ग ठप्प.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर कमी, दोन्ही बाजूने रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे 

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर कमी, रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे 


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती 


ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नाहूर भांडुप कुर्ला सायन या स्थानकांच्या जवळ आठ इंचापेक्षा जास्त पाणी साचले होते 


मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने हे पाणी आता चार इंचापेक्षा कमी पातळीवर आले आहे 


त्यामुळे दोन्ही बाजू कडून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे 


सकाळी 5.30 ते 6.15 वाहतूक पूर्णपणे बंद होती, आता सुरू झाली आहे,


ठाण्यावरून सीसीएमटीकडे आणि सीएसएमटी कडून ठाण्याकडे लोकल सोडण्यात आलेले आहेत 


भांडुप स्थानकत सर्वाधिक पाणी साचले होते मात्र आता या ठिकाणी पाणी पूर्णतः वाहून गेले आहे

Mumbai Rain Update : मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसही रद्द

Mumbai Rain Update : मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसही रद्द

Parbhani Rain : परभणीत दमदार पावसाची हजेरी, 2 दिवसांच्या खंडांनंतर परभणीत पाऊस बरसतोय.

Parbhani Rain : परभणीत दमदार पावसाची हजेरी 


2 दिवसानंतर पावसाने लावली हजेरी 


परभणी शहरासह जिल्हाभरातील विविध भागांमध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली आहे.


2 दिवसांच्या खंडांनंतर परभणीत पाऊस बरसतोय.


दिवसभर उकाडा जाणवल्यानंतर मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असुन पिकांना ही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.


दरम्यान जिल्ह्यात अजुनही प्रकल्प साठ्यात वाढ होईल, असा पाऊस झाला नसल्याने परभणीकर या सर्वदूर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत

Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पाणी पातळी कमी झाली

Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरला 


नद्यांची पाणी पातळी झाली कमी 


 मुसळधार पावसाचा इशारा पाहता आज शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्याचा निर्णय

Akola : अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रभर धुवांधार पाऊस. नद्यांचा जलस्तर वाढला.

Akola : अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रभर धुवांधार पाऊस. अकोला शहरातील अनेक सकल भागात साचलं पावसाचं पाणी. अकोला शहरातील डाबकी रोड भागातील शिवाजीनगरमध्ये अनेक घरांत घुसलं पावसाचं पाणी. जिल्ह्यातील अनेक नद्यांचा जलस्तर वाढला.

Mumbai Rain Update : मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेवरील CSMT, सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप याठिकाणी पाणी साचलं

Mumbai Rain Update : मध्य रेल्वेवरील CSMT, सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप य़ा ठिकाणी पाणी साचलं


हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं

Mumbai Rain Update :  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्यापलीकडे मुंबईसाठी ट्रेन उपलब्ध नाही.

Mumbai Rain Update :  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, टिटवाळा, आसनगाव कसारा येथून येणाऱ्या सर्व गाड्या ठाण्यापर्यंत चालवल्या जात आहेत. 


ठाण्यापलीकडे मुंबईसाठी ट्रेन उपलब्ध नाही.

Mumbai Rain Update :  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्यापलीकडे मुंबईसाठी ट्रेन उपलब्ध नाही.

Mumbai Rain Update :  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, टिटवाळा, आसनगाव कसारा येथून येणाऱ्या सर्व गाड्या ठाण्यापर्यंत चालवल्या जात आहेत. 


ठाण्यापलीकडे मुंबईसाठी ट्रेन उपलब्ध नाही.

Mumbai Rain Update : पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत, सिंहगड, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

Mumbai Rain Update :  मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत, सिंहगड, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

Mumbai Rain Update : हार्बर लाइनमध्ये पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकीस विलंब. 

Mumbai Rain Update : मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे हार्बर लाइनमध्ये पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकीस विलंब. 


 





Mumbai Rain Update : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचलं, ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन बंद, रेल्वे रुळावर पाणी भरलं

Mumbai Rain Update : मुंबई-ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचलं


 ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन बंद आहेत...


भांडुप आणि कुर्ला स्टेशनला पाणी साचले आहे ..


 ठाणेपर्यंत ट्रेन जात आहेत..


रेल्वे रुळावर पाणी भरलेले आहे

Mumbai Railway Rain Update : मुंबईत पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, मुंबई ते नागपूरच्या ट्रेन मुंबईवरून उशिरा सुटत आहेत

Mumbai Railway Rain Update : मुंबई ते नागपूरच्या ट्रेन मुंबईवरून उशिरा सुटत आहेत...


सेवाग्राम एक्सप्रेस ही मुंबई ऐवजी नाशिक वरून सुटली...


तर विदर्भ एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस या अजून पर्यंत मुंबई स्टेशन वरून नागपूर करता सुटलेल्या नाहीत 

पार्श्वभूमी

Mumbai Thane Rain Blog LIVE : रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी म्हणजेच उद्या सुट्टी जाहीर पावसाळी खबरदारी आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्भूमीवर प्रशासनाचा निर्णय घेण्यात आलाय.  रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) बंद राहणार आहेत विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार  दि. 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतेच दिले आहेत.


सिंधुदुर्ग ब्रेकिंग


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळां, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणी महाविद्यालय राहणार उद्या बंद


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केले जाहीर


रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी 


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार  दि. 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.