रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीच्या कामासाठी चिपळूणचा वाशिष्टी पूल रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चार वाजेपर्यंत काम पूर्ण न झाल्याने सात तास वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, दोन ते तीन किलोमीटरपर्यत लागल्या होत्या. अखेर सात तासानंतर पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्याचसोबत कोकण रेल्वेचीही वाहतूक पूर्ववत झाली आहे.


वशिष्टी नदीवरचा पुलाच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. वेळेत काम पूर्ण न झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोकणवासियांची दुहेरी अडचण झाली होती. एकीकडे इंजिन रुळावरुन घसरल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता तर दुसरीकडे वशिष्टी नदीवरच्या पुलाचं काम सुरु असल्याने हा पूल बंद ठेवण्यात आला होता. 


कोकण रेल्वेमार्गही पूर्ववत
राजधानी एक्सप्रेसचे इंजिन  रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. पहाटे चार वाजता ठप्प झालेली कोकण रेल्वे अखेर पाच तासानंतर रुळावर आली आहे. पहाटे चार वाजता हजरत निजामुद्दीन-मडगांव या गाडीच्या इंजिनचं चाक रुळावर बोल्डर आल्यामुळे घरसले होते. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. सर्वे गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर उभ्या करत कर्मचाऱ्यां अलर्ट केले गेले होते. अखेर पाच तासानंतर कोकण रेल्वे रुळावर आली असून थोड्याच वेळात एक्सप्रेस मडगांवकडे रवाना होणार आहे. उक्षी ते रत्नागिरी रेल्वे स्थानक दरम्यान करबूडे बोगद्यात ही घटना घडली होती.


मुंबई-गोवा मार्गावर सध्या खड्डेच-खड्डे असं चित्र 
मुंबई-गोवा मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना खड्डयांचा प्रवास होत आहे. मुंबई-गोवा मार्गावर सध्या खड्डेच-खड्डे असं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते तळेकांटे तसेच लांजा या 90 किमी मार्गावर सध्या खड्डेच-खड्डे आहेत. जवळपास 1400 कोटींचं हे काम असून एमईपी कंपनीकडून दोन वर्षानंतर केवळ 15 टक्केच काम झालं आहे. कोकणातील पावसाळा पाहता यंदा सुरुवातीलाच दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना होत आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करताना धो-धो कोसळणाऱ्या पावसात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यांची सारी परिस्थिती पाहता नेमका कोणता खड्डा चुकवायचा हाच प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Corona Update India : देशात कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत, 1183 रुग्णांचा मृत्यू
Petrol Diesel :  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर
चिखलदऱ्यात साकारतोय जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक