Mumbai Fire : मुंबईच्या दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरामध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर सातमध्ये झोपड्यात ही मोठी आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात आजूबाजूला झोपडपट्टी असल्यामुळं आग आजूबाजूला पसरली आहे. आगीचा माहिती मिळतच अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
सुदैवाने या आगीमध्ये आतापर्यंत कोणतेही जीवित हानी झालेली नाही
मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने या आगीमध्ये आतापर्यंत कोणतेही जीवित हानी झालेली नसून मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात घरे जळून खाक झाले आहेत. आग कशामुळे लागली या संदर्भात अग्निशमन दलाचे जवान आणि एम.एच.बी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तोडणीला आलेला पन्नास एकरातील ऊस जळून खाक
बेळगावमधील चिकोडी तालुक्यातील येडुर येथे तोडणीला आलेला पन्नास एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. पाण्याच्या मोटारीना विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली आहे. येडुर कल्लोळ बंधाऱ्या जवळील शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बघता बघता ही आग आजूबाजूच्या शेतातील उसाला लागली आणि पन्नास एकरातील तोडणीला आलेला ऊस आगीत भस्मसात झाला आहे. उसाला आग लागल्याचे वृत्त कळताच साखर कारखान्याच्या आणि सदलगा येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. त्यामुळे बाकीच्या शेतातील ऊस वाचला. तोडणीला आलेला ऊस भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांनी वीज पुरवठा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तारांच्या मुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या चार घटना गेल्या पंधरवड्यात घडल्या आहेत.