Jayakumar Gore on Eknath Shinde :  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड आणि डहाणू येथील प्रचारसभांमध्ये जोरदार टीका केली. एकाधिकार शाही आणि अहंकाराविरोधात आपण आता एकत्र आलो आहोत, असे म्हणत नाव न घेता भाजपला खोचक टोला लगावला. एकनाथ शिंदे यांनी मतदारांना एकाधिकारशाही आणि अहंकार यांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला फार सिरियसली घेण्याची गरज नाही. स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतोय, अशी वक्तव्य होतच असतात असं गोरे म्हणाले.  

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

डहाणू येथील सभेत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता भाजपला टोला लगावला होता. त्यांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. डहाणू येथे अहंकाराच्या विरोधात आपण लढत आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. तसेच रावणाच्या अहंकाराचे उदाहरण दिले होते. रावणाच्या अहंकारामुळे त्याची लंका जळून खाक झाली, असे सांगत त्यांनी 2 तारखेला मतदारांनी असेच काम करावे असे आवाहन केले. डहाणू नगरपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाने आणि काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधल्याचं दिसतंय. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदेंची माणसं फोडली जात आहेत. त्यावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही सुरू होती. याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी डहाणूमध्ये केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व आहे.

आम्ही महायुती असलो तरी स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र लढत आहोत : जयकुमार गोरे

दिल्ली दौऱ्यानंतर डहाणू येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहंकारा विरोधात आपला लढा असल्याचे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला धाराशिव इथे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिल. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला जास्त सिरीयसली घ्यायची गरज नाही असं गोरे म्हणाले. आम्ही महायुती असलो तरी स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र लढत आहोत त्यामुळे असे वक्तव्य होत असतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा