Amravati : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अमरावती महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बडनेरा झोनमध्ये कार्यरत असलेले राजेश मोहन असे विष प्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अग्निशामक दलाचे लक्ष्मण पावडे आणि संतोष केंद्रे हे दोन अधिकारी वारंवार मानसिक त्रास देत होते. त्यामुळं आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ देखील मृत्यूपूर्वी कर्मचाऱ्याने केला आहे.
रात्री उशिरा दोषी अग्निशामक दलाचे लक्ष्मण पावडे आणि संतोष केंद्रे यांच्या निलंबनाचे आदेश
रात्री उशिरापर्यंत अमरावतीच्या शवविच्छेदन गृहाबाहेर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांच्यासह नातेवाईक आणि आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरा दोषी अग्निशामक दलाचे लक्ष्मण पावडे आणि संतोष केंद्रे यांच निलंबनाचे आदेश अमरावती महानगरपालिका आयुक्त यांनी काढले आहेत. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करु देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर अखेर पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर, तेरा वर्षीय विद्यार्थिनींने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवल जीवन
महत्वाच्या बातम्या: