Madhya Pradesh Principal And Teacher Clash: मध्य प्रदेशमधील खरगोनमधील एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय (Eklavya Adarsh Residential School) येथे मुख्याध्यापक आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका यांच्यात भांडण झाल्याची एक घटना (Madhya Pradesh Principal And Teacher Clash) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्यध्यापिका आणि ग्रंथपाल हे दोघेही एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहे. शाळेच्या परिसरातच झालेल्या हाणामारीमुळे खळबळ उडाली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून, दोघांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्यध्यापिका प्रवीण दहिया आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका मधुराणी यांच्यात जोरदार भांडण सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. व्हिडीओमध्ये, दोघे एकमेकांना मारताना, एकमेकांचे केस ओढताना आणि मोबाईल फोनवर रेकॉर्ड करत एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. घटनेच्यावेळी इतर अनेक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते, परंतु कोणीही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, बरेच लोक व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते. अखेर एका महिला कर्मचाऱ्याने मध्यस्थी केली.
सदर घटनेचा संपूर्ण Video:
ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिकेने मुख्याध्यापिकांवर केले आरोप-
ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका मधुराणी यांनी आरोप केला की, मुख्यध्यापिका प्रवीण दहिया माझ्यावर खोट्या सह्या करण्यासाठी दबाव आणत होते. मी खोट्या सह्या करण्यास नकार दिला. तसेच मुख्यध्यापिकांचा मुलगा कोणत्याही कारणाशिवाय शाळेच्या आवारात फिरतो आणि माझ्यासमोर अश्लील हावभाव करुन दाखवतो. मी यासंदर्भात तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती मधुराणी यांनी दिली.
शाळा याआधीही वादाच्या भोवऱ्यात-
एकलव्य आदर्श निवासी शाळा दिल्लीतून चालवली जाते आणि येथील मुलांच्या शिक्षणासाठी आणि निवासी सुविधांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाते. मात्र असे असूनही, शाळा यापूर्वी अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे वादात सापडली आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शनेही केली आहेत.