पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटे  साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दहाजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरई-सतिवली येथे कोहीनूर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस उलटल्याने मोठा अपघात झाला.

 

या अपघातात दहाजण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना मनोर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.