- 1993 मुंबई बॉम्बस्फोट- कट रचणे, हत्याप्रकरणी मुस्तफा डोसा टाडा कायद्याप्रमाणे दोषी
- आरोपी फिरोज खान आणि ताहीर मर्चंट कट रचणे, हत्या आणि टाडा कलमांअंतर्गत दोषी
- करीमुल्ला शेख दोषी, टाडा कोर्टाचा निकाल
- अबू सालेम दोषी
- भारताविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपातून सर्व आरोपांची मुक्तता
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 16 Jun 2017 07:39 AM (IST)
मुंबई: मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. तर एका आरोपीची निर्दोष सुटका होणार आहे. विशेष टाडा कोर्टानं हा महत्वपूर्ण निकाल दिला. डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर अब्दुल्ल कय्यूम हा मात्र सर्व आरोपातून मुक्त झाला असून, कोर्टाने त्याला निर्दोष ठरवलं आहे. कट रचणे, हत्या आणि टाडा कलमांअंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. मात्र 25 वर्षानंतर दिलेल्या निर्णयाला न्याय म्हणायचं कसं हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान कोर्टाची आजची कारवाई पूर्ण झाली असून सोमवारीपासून दोषींवर शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरु होणार आहे. LIVE UPDATE