बीड: बीड येथील धारुरमधील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. धारूरच्या ऐतिहासिक किल्ला परिसरातील तलावात उडी मारुन या प्रेमी युगुलानं आत्महत्या केली. रोहिणी थोरात (२१ वर्ष) आणि महेश चंद्रकांत ढगे (२४ वर्ष, कसबा, धारुर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.


या दोघांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्यापही समजलेलं नाही. दरम्यान, त्यांच्याकडून एक सुसाईड नोट सापडली आहे.

‘आमच्या स्वेच्छेने आम्ही आत्महत्या करीत आहोत, कोणालाही दोषी धरु नका..’ अशी सुसाईड नोट लिहून एका प्रेमीयुगुलाने येथील ऐतिहासिक किल्ला परिसरातील तलावात उडी मारुन आपलं जीवन संपवलं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.