Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. याच कारणामुळे यावेळी महिलांना मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का? असा सवाल केला जातोय. याच मुद्द्यावरून लाखो महिलांत संभ्रम निर्माण झाला आहे. यावरच आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वत: समोर येऊन सगळा संभ्रम दूर केला आहे.
आदिती तटकरे यांची विरोधकांवर टीका
आदिती तटकरे यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती दिली आहे. "विरोधकांना सुरुवातीपासूनच ही योजना खुपते आहे. या योजनेमुळेच विरोधकांना नैराश्य आलं आहे. याआधी दोनी कोटी 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्याही लाभार्थी तेवढ्याच असतील. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांना ही योजना खुपते आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांत महिलांचा या योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेही विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य आलेलं आहे. हेच नैराश्य ते लाडक्या बहिणींमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोन्ही महिन्यांचे पैसे नेमके कधी मिळणार?
मात्र महायुतीचं सरकार हे सक्षम आहे. ही योजना आम्ही यशस्वीरित्या चालू ठेवणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर मार्च महिन्याचा हफ्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात टाकला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार नाहीत
म्हणजेच आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार नाहीत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे 7 मार्च रोजी मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, हे स्पष्ट झाले आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या, पाहा व्हिडीओ :
हेही वाचा :