मुंबई: संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे.
कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, प्रशासनाचा इशारा ऐन दिवाळीमध्ये एसटी ठप्प झाल्यानं दिवाळीसाठी घरी परतणाऱ्या लोकांना कालपासूनच मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
दुसऱ्या दिवशीही संप सुरुच एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या : - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.
किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या? - राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.
- दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.
- एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.
संबंधित बातम्या
कर्जमाफी, ST संप, सोशल मीडिया नोटीस आणि मुख्यमंत्र्यांची उत्तरं कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, प्रशासनाचा इशारा