मुंबईः एमएसआरडीसीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षेबाबत आयआरबीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. येत्या 60 दिवसात रस्त्यावर संपूर्ण सुरक्षायोजना करण्याचे निर्देश एमएसआरडीसीने दिले आहेत, अशी माहिती रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आयआरबीने सुचनांचे पालन न केल्यास एमएसआरडीसी कायदेशीर कारवाई करेल, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 100 सुरक्षित करण्याचे निर्देश एमएसआरडीसीने दिले आहेत.
मुंबई-नागपूर फक्त 6 तासात
मुंबई-नागपूर या 750 किमीच्या महामार्गाचं सादरीकरण आज कॅबिनेटमध्ये करण्यात आलं. या महामार्गाला 'महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर' हे नाव देण्यात आलं आहे. हा रस्ता आठ पदरी असून मुंबई ते नागपूर अंतर केवळ 6 तासात कापता येणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या महामार्गामुळे राज्यातील 14 जिल्हे जोडले जाणार आहेत.