सोलापूर : सोलापूरमध्ये दोन सख्ख्या भाऊ-बहिणीची डीवायएसपी अर्थात पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. सचिन आणि सोनाली कदम अशी या गुणवंत भाऊ-बहिणीची नावं आहेत. ते माढा तालुक्यातील उपळाई गावचे रहिवासी आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2016 साली घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला आला आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत तब्बल 526 गुण मिळवत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींमधून साताऱ्याची पूनम संभाजी पाटील पहिली आली आहे. पूनमही अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असून पोलिस उपअधीक्षक पदाकरता तिची निवड करण्यात आली आहे.

याच परीक्षेत उपळाई गावातील सचिन कदम आणि सोनाली कदम या भाऊ-बहिणीची गुणवत्तेच्या जोरावर एकाच वेळी पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. एमपीएससी निकालांमध्ये दोघांचं नाव झळकल्यानंतर उपळाईमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

संबंधित बातमी

MPSCचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे राज्यात प्रथम