मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी आणि इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना ही यादी https://mpsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 


जवळपास 8,000 पेक्षा जास्त लिपिक टंकलेखक पदांसाठी सदर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल या आधीच जाहीर झाला होता. आता त्याची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रतीक्षा यादीत एकूण 155 उमेदवारांची नावे आहेत. 


 






MPSC राज्यसेवा परीक्षा 6 जुलै रोजी 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या आधी ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. पण नंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि आता 6 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. 


सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत.


प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.


शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.


अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.


ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*


भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.


चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे.


ही बातमी वाचा: