MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे 27 ते 29 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1,516 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पार पडली. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एकूण 7,970 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 7,732 उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अर्जप्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती.

MPSC Result 2024: निकाल न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन

Continues below advertisement

एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, हा निकाल आरक्षण, समांतर आरक्षण आणि अन्य न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी हवी असल्यास, गुणपत्रक मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC Result 2024: कट-ऑफमुळे उमेदवारांमध्ये चर्चेचा विषय

यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कट-ऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातीसाठी 447 गुणांवर, तर अनुसूचित जमातीसाठी 415 गुणांवर गेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उच्च कट-ऑफमुळे आश्चर्य व्यक्त करत “स्पर्धा अधिक तीव्र झाली” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

MPSC Result 2024: विजय लमकणे राज्यात पहिला, प्रगती जगताप एससी प्रवर्गातून अव्वल

राज्यात पहिला क्रमांक पटकावणारे विजय नागनाथ लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले आहेत. सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

मुलींसाठी जबरदस्त योजना! शिक्षण ते लग्नाची चिंता मिटणार, 70 लाखांची निधी उभारणार 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI