Bacchu Kadu : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu )  यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरतील आंदोलनाला (Bacchu Kadu Farmer Protest) आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनादरम्यान नागपुरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास व मन:स्ताप सहन करावा लागला. बेकायदेशीरपणे महामार्ग अडविले, नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Continues below advertisement

Bacchu Kadu Farmer Protest : आंदोलन संपताच कारवाईचा वरवंटा, विविध कलमांखाली गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास शेतकरी आंदोलक जामठ्याजवळ पोहोचले. त्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चजवळील मोकळ्या जागेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी त्याच्या दोन किमी अलीकडेच वर्धा मार्ग अडविला आणि जवळपास 30 तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर कोंडी होती. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित रहावे लागले. परिणामी, न्यायालयाच्या निर्देशानंतर आंदोलक तेथून हटल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीत अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Continues below advertisement

Pravin Tayade on Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

तर दुसरीकडे, समाजसेवेचा बुरखा पांघरून 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade on Bacchu Kadu) यांनी केली आहे. सोबतच बच्चू कडू यांच्यावर पुन्हा एकदा काही खळबळजनक आरोप केले आहे.

गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय. त्या संदर्भात प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे.