MPSC Exam : PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असं एमपीएससीने कळवलं आहे.
24 डिसेंबर 2022 रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच 31 डिसेंबर 2022 रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, 7 जानेवारी 2023 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि 14 जानेवारी 2023 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील आयोगानं म्हटलं आहे.
सहायक आयुक्त (औषधे) पदासाठीच्या परीक्षेकरता दिलेला अभ्यासक्रम मागो एमपीएससीकडून सहायक आयुक्त (औषधे), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ संवर्गाच्या परीक्षेकरीता दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला अभ्यासक्रम प्रशासकीय कारणास्तव मागे घेण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ च्या भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि अंतिम निकाल/शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI