पुणे : पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आंदोलन  करण्यात आले आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा  2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न थेट रद्द वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या विरोधात काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आह. त्याविरोधात आज पुण्यात अलका टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहे. वाद मिटवून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 


विद्यार्थ्यांनी तिसऱ्या उत्तरतालिका व मुंबई औरंगाबाद नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई न्याालयाने एमपीएससीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गेल्या दोन महिन्यांत यावर एकही सुनावणी झाली नाही.  पुढील महिन्यापासून न्यायालयाला सुट्ट्या लागणार आहे त्यामुळे बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. सरकारने महाधिवक्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी  विनंती करून परीक्षेचा प्रश्न  सोडवावा. आयोगाने जे प्रश्न बरोबर होते ते बरोबर द्यावेत व फेरनिकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी ही काही विद्यार्थ्यांची मागणी आहे.


एमपीएससीच्या पद्धतीनुसार दोन उत्तरतालिका अपेक्षित असताना आयोगाने तिसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी काही प्रश्न रद्द तर काही प्रश्न थेट वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी झाल्याने यावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी प्रश्न बरोबर असताना ते रद्द करू नयेत, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी ही मागणी केली असताना एमपीएससीने निकाल जाहीर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले आहेत. एमपीएससीने या मुख्य परीक्षेबाबत निर्माण झालेला गोंधळ तातडीने तोडगा काढून दूर करावा. आता विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.


संबंधित बातम्या :


Breaking News : रेकॉर्ड ब्रेक... MPSC चा सुपरफास्ट निकाल; मुलाखतीनंतर अवघ्या दोनच तासात लावली मेरिट लिस्ट


MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी