MPSC Exam: लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अनेक उमेदवारांना अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांमध्ये व्यक्त होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 131 अंतर्गत सहायक संचालक (माहिती) पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. तसेच 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी...असं म्हणत MPSC नियमांवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. जाहिरात क्र. 131 सहायक संचालक (माहिती) भरती प्रक्रियेवर उमेदवारांचा सवाल उपस्थित करुन सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
उमेदवारांचे म्हणणे आहे की, लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सध्याच्या पद्धतीत मुलाखतीसाठी निश्चित किमान गुणांची अट असल्यामुळे लेखी परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांनाही अपात्र ठरवले जाते. जर अंतिम निर्णय मुलाखतीतील पात्रता गुणांवरच अवलंबून असेल, तर लेखी परीक्षा घेण्याचा उद्देश काय? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी महिनोनमहिने मेहनत घेतली, चांगले गुण मिळवले; मात्र मुलाखतीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्यांची संपूर्ण गुणवत्ता दुर्लक्षित झाल्याची भावना आहे. उमेदवारांनी दिलेल्या उदाहरणानुसार, एखाद्या उमेदवाराला लेखी परीक्षेत 96 गुण मिळाले असले तरी मुलाखतीत पात्रतेपेक्षा एक गुण कमी मिळाल्यास तो अपात्र ठरतो. दुसरीकडे, लेखी परीक्षेत 50 गुण आणि मुलाखतीत केवळ पात्रतेचे 21 गुण मिळवणारा उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र ठरतो. त्यामुळे एकूण गुणसंख्या अधिक असूनही काही उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. (MPSC Exam)
ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त, त्यांनाच संधी मिळावी, उमेदवारांच मागणी (MPSC Exam)
उमेदवारांचे म्हणणे आहे की राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच धर्तीवर एकूण गुणांचा विचार व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. मुलाखतीत एक गुण कमी मिळाला म्हणून अपात्र ठरवणे आणि कमी एकूण गुण असलेले उमेदवार पात्र ठरणे, हा आमच्यावर अन्याय आहे. सरकारने आणि MPSC ने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे. उमेदवारांनी निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच लेखी व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त, त्यांनाच संधी मिळावी. मुलाखतीतील किमान गुणांच्या अटीमुळे गुणवंत उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI