Bhandara News : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी डण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेना (Shivsena) आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत, "एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार," असा निर्धार व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात (Bhandara News) शिवसेना, प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होता. यावेळी शिवसेना नेते आमदार बच्चू कडू त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार भोंडेकरांनी हा निर्धार व्यक्त केला.

Continues below advertisement

Shivsena : मिशन विदर्भ, 62 पैकी 30 जागांवर दावा, आमदार भोंडेकरांच्या विधानानं राजकीय वर्तुळात भूकंप!

दरम्यान, आमदार भोंडेकर एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे. "आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर, आम्ही 11 झालो आहोत," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधला. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी किमान 30 जागा जिंकून आणायच्या आहेत. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि तो आमचा अधिकार आहे. आमचं एकच स्वप्न आणि एकच संकल्प आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं!" असेहीतेम्हणाले. भोंडेकरांच्या या थेट दाव्यामुळे आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement
Pratap Sarnaik: आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे

दुसरीकडे अमरावतीत देखील शिवसेनेची आढावा बैठक संपन्नझाली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांना बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, आमचा नेता मुख्यमंत्री व्हावं, यासाठी आम्ही कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असून त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामे केली आहे. त्यामुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं, सरनाईक म्हणाले. अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अमरावती येथील हॉटेल ग्रॅण्ड महफील याठिकाणी ही आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाभरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.