सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि चर्चा यांचं जणू एक समीकरणचं बनलं आहे. उदयनराजे भोसले बेधकड वक्तव्य आणि हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग साताऱ्यात आणि महाराष्ट्रात आहे.


काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उदनय राजेंनी गायलेल्या गाण्याची साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु होती. उदयनराजे आता पुन्हा त्यांची गायलेल्या गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. 'तेरे बिना जिया जाये ना...' हे गाणं उदयनराजेंनी गायलं. उपस्थितांनीही त्यांच्या गाण्याला मनसोक्त दाद दिली.


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. उदयनराजेंनीही साताऱ्यात प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत होते. मात्र उदयनराजेंनी विकास कामांचा पाढा न वाचता उपस्थितांना गाणं ऐकवलं.


व्हिडीओ-