MP Sambhaji Raje Chhatrapati on Maratha Reservation : आज आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो, मात्र अनेकजण आले आहेत. मला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या घराण्याला पाठिंबा आहे. माझा लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी माझा लढा असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले.
आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत ही वेळ यायला हवी नव्हती परंतू, सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी रहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमरण उपोषण सुरू करण्यापूर्वी संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर प्रसारमाध्यमंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मी 2007 पासून महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे याची जाणीवजागृती केली पाहिजे असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत गरिब मराठा समाजाने काय करायचे? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. परंतू, 2007 पासून हा मुद्दा मी पुढे नेत आहे, आत्ता जर काही केले नाही तर काय उपयोग, म्हणून मी उपोषण करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
15 दिवसांत आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. त्यानंतर आम्ही नाशिके मुक आंदोलन थांबवले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 400 कोटींची घोषणा केली. मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तेथील अडचणी सोडवल्या नाहीत असे संभाजीराजे म्हणाले.
ठाण्यात फक्त वसतीगृह सुरु झाली, तिही पालाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने झाले. तुम्ही काय केलं? असा सवाल यावेळी संभाजीराजे यावेळी म्हणाले. ज्याच्यामुळे एवढे मोर्चे निघाले त्या कोपर्डीचे काय झालं? असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. मी महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वजण म्हणाले की, तुम्ही हे नेतृत्व केलं पाहिजे. 2013 मध्ये मी लाखोंच्या संख्येने आंदोलन केले. ज्यावेळी जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता होती, त्यावेळी कोण मंचावर जात नव्हते, त्यावेळी मी गेलो आणि सर्वांना आवाहन केले असेही संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: