पंढरपूर : रायगडावरील रोषणाई प्रकरणी खासदार संभाजीराजे भडकले. आम्हाला शिवभक्ती शिकवू नये, माझा रोष पुरातत्व खात्यावर मात्र किल्ले रायगडावरून कुणी राजकीय आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराच संभाजीराजेंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला.


शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडाला केलेल्या विद्युत रोषणाईवरून राजकीय आरोप करणाऱ्यांवर आज संभाजीराजे भडकले. मी भाजपाची शाल पांघरून फिरत नाही, किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी मी गेले अनेक वर्षे दिवसरात्र झटत असताना माझ्यावर कोणी राजकीय शेरेबाजी केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आज संभाजीराजे यांनी पंढरपूरमध्ये दिला. रायगडावर केलेली रोषणाई नक्कीच योग्य आणि महाराजांचा सन्मान ठेवणारी नव्हती. मात्र यासाठी पुरातत्व विभागाने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते . मात्र भावना चांगली आहे म्हणून काहीही चालवायचे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत मी कोणतेही विधान केले नव्हते. तर माझा सर्व रोष पुरातत्व विभागावर होता. नेहमी शांत आणि संयमी अशी देशाला ओळख असलेले संभाजीराजे छत्रपती हे दुखावले गेल्याने आज त्यांचे वेगळेच रूप पंढरपूरमध्ये पाहायला मिळाले. मी एखाद्या पक्षाचा खासदार असलो तरी मी आजवर एकजरी फायदा घेतल्याचे दाखवून दिल्यास लगेच राजीनामा देईन, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली.


गेल्या काही वर्षांपासून किल्ले रायगडाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आता समोर येत असल्याचे सांगताना किल्ल्यावरील एक दगड हलवायलाही जे पुरातत्व खाते परवानगी देत नाही त्यांनी विद्युत रोषणाईला कशी परवानगी दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. किल्ले रायगडावर भसाड पद्धतीची रायगडाला शोभेशी रोषणाई करणे अपेक्षित असून यासाठी आता आमच्या प्रयत्नाला यश येत आहे, असे सांगितले. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची ओळख मीच करून दिली होती, असे राजेंनी सांगितले.


आमच्या फोर्ट फेडरेशनकडून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याची राजधानी ते जलदुर्ग मार्गे राजांची राजधानी असा टुरिझम डेव्हलप करायचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले . पुरातत्व विभाग माझ्या ताब्यात द्यावा, असेही संभाजीराजे यांनी सांगितले. देशातील कृषी कायदे चुकीचे नसून त्यात काही बदल करणे गरजेचे आहे मात्र आता या शेतकऱ्यांशी योग्य संवाद साधून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न मिताने गरजेचे असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.


शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं