मुंबई:  छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केलं आहे. या ट्विटचा रोख खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा आहे. खासदार संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे पण ती कुठे दिसत नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी काल केली होती. यावर प्रत्युत्तर देताना संभाजीराजे यांनी म्हटलंय की, ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.


Special Report : राज्यात प्रकाश आंबेडकर-छत्रपती संभाजी राजेंची नवी राजकीय आघाडी? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा


काय म्हणाले होते नारायण राणे 
काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे म्हणाले होते की, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं, असं नारायण राणे म्हणाले होते. 


Maratha Reservation : 6 जूनपर्यंत आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरुन... खासदार संभाजीराजेंचा इशारा, केल्या या मागण्या....


संभाजीराजे यांचं ट्वीट
काल राणेंनी केलेल्या टीकेनंतर संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलंय की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. ताकदच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.






.... तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार


6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. ते म्हणाले होते की, मी राज्यसभेचा पगार घेतो, ती माझी जबाबदारी आहे. आता लोकांची जबाबदारी नाही तर ती आता आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.