कोल्हापूर : जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करून तिचं काळीज परातीत काढून ठेवणाऱ्या नराधमाला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुनील कुचकोरवी असं आरोपीचं नाव असून कोल्हापूरच्या ताराराणी चौकातल्या माकडवाला वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.


शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी आरोपी सुनील दारूच्या नशेत होता. त्यानं आई यलव्वा हिच्याकडे जेवण मागितलं. मात्र, दारुड्या सुनीलला आईनं घराबाहेर काढलं. रागाच्या भरात सुनीलनं आईवर तीक्ष्ण हत्यारानं वार करत तिची हत्या केली.

मात्र, तेवढ्यानं तिच्यावर समाधान झालं नाही. त्यानं आईचं काळीज भांड्यात काढून ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी सुनीलला अटक केली आहे.

दरम्यान, सुनीलच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी आणि मुलं मुंबईला निघून आल्याची माहिती मिळत आहे.