*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/08/2017*

  1. बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा, साध्वी बलात्कारप्रकरणात 15 वर्षांनी न्याय, सीबीआय कोर्टाच्या निकालानंतर राम रहीम ढसाढसा रडला https://gl/eBoEfs


 

  1. हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निकाल देणाऱ्या न्यायाधीशांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव, समाजसेवक असल्याने माफी देण्याची राम रहीमची मागणी जगदीप सिंग यांनी फेटाळली https://gl/eBoEfs 


 

  1. कोर्टाचं कामकाज पोरखेळ आहे का, हायकोर्टाची 155 वर्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, ध्वनी प्रदूषणाच्या याचिकेवरुन माफी मागणाऱ्या फडणवीस सरकारला न्यायमूर्ती ओक यांनी झाप झाप झापलं https://goo.gl/jjQhD5


 

  1. भारताच्या व्यूहरचनेचा मोठा विजय, डोकलाममधील सैन्य हटवण्यास भारत आणि चीन दोन्ही देश तयार, मात्र गस्त कायम ठेवण्याचा चीनचा निर्णय https://gl/ahDhm9


 

  1. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ ही निव्वळ अफवा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण https://gl/swrckq


 

  1. नारायण राणेंच्या घरी गणपती दर्शनासाठी भाजपच्या नेत्यांच्या रांगा, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राणेंच्या घरी http://abpmajha.abplive.in/


 

  1. राज्यभर अपघातांचं सत्र, पुण्यातील नारायणगावाजवळ 11 जणांचा मृत्यू https://gl/5RjWsE, नाशकातही 10 जणांनी प्राण गमावले, 24 तासात अपघाताचे 23 बळी


 

  1. पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, तर वाळपईतून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे विजयी, गोवा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची बाजी https://gl/VghmTc 


 

  1. दिल्लीत बावना पोटनिवडणुकीत ‘आप’चा दणदणीत विजय, 24 हजार मतांनी भाजपचा पराभव, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर https://gl/ToX4kG


 

  1. आता एक हजाराची नवी नोट बाजारात आणण्याच्या हालचाली सुरु, डिसेंबरपर्यंत नोट चलनात येण्याची शक्यता https://gl/XnFR36


 

  1. पेट्रोल-डिझेलचे दर हलक्या पावलांनी सत्तरी पार, दररोज बदलणाऱ्या दरांचा फटका https://gl/HRsWxt


 

  1. निसटलेला फोन धरताना आईच्या हातून मुलगी घसरली, मुंबईत दहाव्या मजल्यावरुन पडून चिमुरडीचा मृत्यू https://gl/MrfzUX


 

  1. याकूब मेमनसह निर्भयाच्या दोषींना फाशीवर चढवणारे जस्टिस दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश, 45 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ https://gl/WVBD8f


 

  1. चंद्रपुरात दुर्मिळ जातीचा पांढरा कोब्रा आढळला, सर्पमित्रांकडून कोब्रा नैसर्गिक अधिवासात https://gl/6TzqPe


 

  1. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, रायगडमध्येही दमदार हजेरी, 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज http://abpmajha.abplive.in/


 

*माझा विशेष* : भोंदूबाबांची पैदास रोखण्यास धर्मसंस्था अपयशी आहे ? विशेष चर्चा रात्री 9.30 वा @abpmajhatv वर

*10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय?*

https://goo.gl/SjG5BX 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*