मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळेच्या डायरीतून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.
अमोल काळेच्या डायरीत पुढचे काही टार्गेट लिहून ठेवलेले होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. यामध्ये सहा नावं आहेत. चार जण ठाण्यातील, एक उत्तर प्रदेशातील आणि एका नावाचा उल्लेख मुंबई एसपी असा आहे.
सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई एसपी म्हणजे एसपी नंदकुमार नायर हे असू शकतात. कारण, यापूर्वीही ते सनातनचं टार्गेट असल्याची माहिती समोर आली होती. नंदकुमार नायर यांनी दाभोलकर हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेच्या रुपाने पहिली अटक केली होती. तेव्हापासूनच ते हिंदूत्त्ववादी संघटनांच्या निशाण्यावर होते.
अमोल काळे हा वीरेंद्र तावडेसोबत काम करत होता आणि दोघांनीच दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचं बोललं जात आहे. आता ही नावं नेमकी कुणाची होती याचा तपास केला जात आहे.
अमोल काळे कोण आहे?
अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाचं दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा.
कोण आहे वीरेंद्र तावडे?
वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, कान, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे.
संबंधित बातम्या :
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
नालासोपारा स्फोटकांसाठी श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत : ATS
कट्टर हिंदूत्त्ववाद आणि पुन्हा मराठवाडा कनेक्शन
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 11:35 PM (IST)
यामध्ये सहा नावं आहेत. चार जण ठाण्यातील, एक उत्तर प्रदेशातील आणि एका नावाचा उल्लेख मुंबई एसपी असा आहे. सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई एसपी म्हणजे एसपी नंदकुमार नायर हे असू शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -