मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरपैकी एकनाथ खडसेंच्या नंबरव्यतिरिक्त इतर चार नंबर खडसेंपेक्षाही मोठ्या राजकीय नेत्यांचे आहेत, असा खळबजनक दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला आहे.


मनिष भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉलप्रकरणी माहिती दिली.

मनीष भंगाळे यांनी दाऊदच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरची माहिती सायबर सेलला दिली होती. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप केला होता.

पोलिस यंत्रणा इतर चार नंबरची माहिती काढत नाहीत. ही माहिती काढण्यास किंवा जाहिर करण्यास पोलिस यंत्रणा का घाबरते का, सायबर सेल दबावाखाली आहे का काम करत आहे, असा आरोपही मनिष भंगाळेने केला आहे.

इतर नंबरची माहिती शोधण्यापेक्षा पोलिस आरोपी असल्याप्रमाणे आम्हाला चौकशीसाठी बोलावत असल्याचा आरोप मनीष भंगाळे आणि वकील गितांजली लोखंडे यांनी केला आहे.

दाऊद -खडसे कथित कॉल प्रकरण

मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.

मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन खडसेंना क्लीन चीट दिली आहे.

संबंधित बातम्या :

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’


खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण


दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा


खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन


‘दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार’, प्रीती मेनन यांची माहिती


पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे


‘खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा’