कोल्हापूरचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 12:52 PM (IST)

श्रीनगर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मूतील पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात राजेंद्र तुपारे रविवारी शहीद झाले होते. राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव चंदगड तालुक्यातील कारवे या मूळगावी नेण्यात येईल. तर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.