मुंबई : स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रातले आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो. परंतु यंदा मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या केरळमध्येच 4 जूनला आगमन होत असल्याने 12 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि बळीराजाला पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा देशात सरासरीच्या 93 टक्केच पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी असेल. त्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. यंदा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात फार बरी नसेल, असेही सांगण्यात आले आहे.
मान्सून चार जूनपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रातही मान्सून उशिराने येण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 07:39 PM (IST)
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Heavy rain hits Chiang Rai this afternoon. On Friday, June 15, 2018, in Chiang Rai, Thailand. (Photo by Artur Widak/NurPhoto via Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -