Monsoon Update: मान्सून साधारणतः 1 जूनपर्यंत भारतात दाखल होत असतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची (Monsoon Arabian Sea)  शक्यता आहे. पण दुसरीकडे मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन  त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज  खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तवला आहे. आयएमडीकडून चक्रीवादळासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


हवामान अभ्यासक अक्षय देवरस म्हणाले, आतापर्यंतचा जो अंदाज आहे त्यानुसार 10 ते 15 जून दरम्यान हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून एका सुरक्षित अंतरावर धडकण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ त्याच्यासोबत मान्सूनचे वारे ओढेल आणि जवळपास 12 जूनपर्यंत  गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक- दोन दिवसात म्हणजे 14 जूनपर्यंत मान्सून हा दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत दरवर्षी 11 जूनपर्यंत मान्सून दाखल होतो परंतु सध्याची परिस्थिती पाहता 15 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार नाही. 


चक्रीवादळाची निर्मिती झाल्यास त्याचं नाव बिपरजॉय


अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल  त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळान समुद्रातील बाष्प खेचून नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशिराने होण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाची निर्मिती झाल्यास त्याचं नाव बिपरजॉय असणार  आहे. याआधी मागील तीन ते चार वर्षात अरबी समुद्रात निसर्ग, तोक्ते आणि वायू चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं बघायला मिळालं आहे.  


9 जूनपर्यंत केरळात मान्सून दाखल होणार


पुढील 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तयार होणार  आहे. पुढील  48 तासात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज  आहे. या सिस्टीमचा मान्सूनवर प्रभाव पडणार असून यावर भारतीय हवामान विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. 9 जूनपर्यंत केरळात मान्सून दाखल होण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे आहे.  राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली आहे. 


हे ही वाचा :


कुठे झाडे उन्मळली, कुठे विजेचे खांब कोसळले तर कुठे लग्नात विघ्न; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने राज्यभरात नुकसान