TOP NIRF Ranked Colleges in India 2023: नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework) 2023 मध्ये मुंबई आयआयटी (Indian Institute of Technology Bombay) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे, तर इंजीनियरिंग शैक्षणिक संस्थांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अत्यंत निराशाजनक गोष्ट म्हणजे, देशातील सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra News) एकाही विद्यापीठाला आणि महाविद्यालयाला स्थान मिळालेलं नाही. 


NIRF रँकिंगमध्ये, आयआयटी मद्रास (Indian Institute of Technology Madras) सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम, तर मुंबई आयआयटी (IIT Bombay) संस्थेची मागील वर्षीच्या तुलनेत एका क्रमांकानं घसरण झाली आहे. 


देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत मुंबई आयआयटी चौथ्या स्थानी 


आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry of Education) नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्थां, विद्यापीठांची रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईनं देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये चौथं स्थान मिळवलं आहे. मागील वर्षी ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र यंदा संस्थेच्या रँकिंगमध्ये एका क्रमांकानं घसरण झाली आहे. 


मुंबई आयआयटीनं देशातील इंजिनिअरिंग शैक्षणिक संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी चौथ्या क्रमांकावर आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मिळत आहे. 


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या शैक्षणिक संस्था देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर नवी दिल्लीचं मिरांडा हाऊस महाविद्यालय देशातील महाविद्यालयांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ आणि महाविद्यालयाला सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवता आलेलं नाही.


रँकिंग फ्रेमवर्क शिक्षण, शिक्षण आणि संसाधने (TLR), संशोधन आणि व्यावसायिक सराव (RP), ग्रॅज्युएशन आउटकम (GO), आउटरीच आणि समावेश (OI) आणि परसेप्शन (PR) च्या पॅरामीटर्सच्या पाच व्यापक सामान्य गटांच्या अंतर्गत संस्थांना न्याय देते. पॅरामीटर्सच्या या पाच विस्तृत गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या संख्यांच्या बेरजेवर आधारित रँक दिल्या जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Top NIRF Ranked Colleges in India 2023 Updates: NIRF रँकिग जारी; ओव्हरऑल कॅटेगरीत IIT मद्रासची बाजी, तर टॉप युनिवर्सिटीजमध्ये IISC बंगळुरू अव्वल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI