कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रीय, मराठवाड्याकडे वाटचाल
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 08:50 AM (IST)
मुंबई : यंदा विदर्भामार्गे राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं आज आपली वाटचाल संपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेनं सुरु ठेवली आहे. आज संपूर्ण विदर्भ व्यापत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मान्सून सक्रीय झाला आहे. आज सकाळी सातारा, सोलापूर या पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शिवाय विदर्भातील चंद्रपूर, वाशिम आणि परिसरात पावसाची रिमझिम सकाळपासून सुरु आहे. गेल्या दहा वर्षात यंदा मान्सूननं आपला प्रवेशाचा मार्ग बदलत विदर्भातून प्रवेश केला. मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून मुसळधार बरसावं, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.