Ambernath: अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना अंबरनाथ येथे घडली आहे. पीडित मुलगी आरोपीच्या येथे खाजगी शिक्षण घेण्यासाठी जायची. त्यावेळी आरोपी हा शिकवणी संपल्यानंतरही पीडिताला थांबवून तिचा विनयभंग करायचा. तसेच याबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी द्यायचा. मानसिक शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीनं हा संपूर्ण प्रकार घरच्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर शिक्षकाविरोधात अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसानी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वेच्या स्वानंद इमारतीत एज्युकेट्स अकॅडमी ही खाजगी ट्युशन आहे. या ट्युशनमध्ये शिकवणारा शिक्षक राहुल यादव हा 11 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवणी संपल्यानंतर देखील जबरदस्तीनं थांबवायचा. त्यानंतर बोलण्याच्या बहाण्यानं तिला स्पर्श करून मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवायचा.तसेच तिला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपल्याला तसे करायचे आहे असे सांगायचा.विद्यार्थ्यांनीनं त्याला विरोध केला होता.
मात्र, याआधी देखील तुला स्पर्श करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाईलमध्ये आहेत. त्यामुळं याबाबत कोणाला सांगितलं तर तुला ठार मारेल आणि त्याच्याजवळील व्हिडिओ तुझ्या घरच्यांना पाठवीन अशी धमकी आरोपीनं पीडित विद्यार्थिनीला द्यायचा. अखेर गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीनं घरच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
हे देखील वाचा-
- Crime : चाकण पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून चोरटा पसार, पळून कसा गेला? याबाबतच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ समोर
- Nawab Malik : नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ;' तुरुंगात 'या' वस्तू वापरण्यास कोर्टाची परवानगी
- Nalasopara Crime : नीट उत्तर न दिल्याने दोन भावांना दगडाने मारहाण, आरोपीने चक्क हातोडी उगारली!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha