डोंबिवली रेल्वे रोकोप्रकरण, रेल रोको करणाऱ्या तब्बल 2000 नागरिकांवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


-------------------------------------

बिहारचे दंबग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

------------------------------------

मुंबई: एफडीएची बनावट कॉस्मेटिक विरोधात मोठी कारवाई, जवळपास अड़ीच कोटीचे प्रसिद्ध कंपन्यांचे बनावट कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स जप्त

------------------------------------

सांगली- 275 कोटींच्या घोटाळ्याचा ठपका असलेल्या वसंतदादा जिल्हा बँकेच्या संचालकांना दणका, सहकार विभागाकडून मालमत्ता जप्तीची संचालकांना नोटीस

-----------------------------------

वर्धा: देवळी येथील केंद्रीय पारेशन कंपनीच्या ट्रान्सफॉर्मला लागली आग, तांत्रिक बिघाडामुळे 765 kv ट्रान्समिशनला आग लागल्याची माहिती

-----------------------------------

BREAKING : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार, एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

-------------------------------------

मुंबई : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील झोपडपट्टीत आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

-------------------------------------



सातारा: महिलेचा विनयभंग केल्याचं प्रकरण, आमदार जयकुमार गोरे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

-------------------------------------

हेडलाईन्स:

युतीबाबत चर्चेसाठी भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता जाणार

डोंबिवली रेल्वे स्टेशनवर रेल रोको, अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईनं संतप्त नागरिकांकडून रेल रोको, रेल्वे वाहतूक ठप्प

गोव्यात भाजपची 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 11 नव्या चेहऱ्यांना संधी

---------------------------

1.  महापालिकांसह झेडपी निवडणूक रणधुमाळीला सुरुवात, मुंबई-ठाण्यासह 10 पालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी

---------------------------

2. 25 झेडपी आणि 283 पंचायत समितीसाठी २ टप्प्यात मतदान, 16 फेब्रुवारीला विदर्भ-मराठवाड्याची परीक्षा तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात 21 फेब्रुवारीला मतदान

---------------------------

3. भाजप राज्यकारिणीची आज बैठक, आगामी पालिकांच्या युतीसंदर्भात चर्चेची शक्यता, तर स्थानिक पातळीवर युतीशिवायही जिंकण्याचा दानवेंना विश्वास

---------------------------

4. नोटाबंदीनंतरही नगरपालिका आणि युपीत भाजपनं इतका पैसा कुठून आणला? राज ठाकरेंचा सवाल, 10 पालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार

---------------------------

5.  सरसंघचालक आणि मोदी देश चालवतात, जनवेदना सभेत राहुल गांधींचा निशाणा, मोदींच्या योगासनाचीही खिल्ली

---------------------------

6. मुंबईसह राज्यभरात थंडीचा जोर वाढला, नाशकात तब्बल 5 डिग्रीची नोंद