ठाणे : युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा!...असे पोस्टर ठाणे शहरात लावत, ठाणे भाजपने महापालिका निवडणुकांत युती करण्यास विरोध केला आहे.


ठाण्यात आज भाजपच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ठाणे भाजपचे पोस्टर्स

नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती भाजपाच्या विजयाची! आम्ही ठाणेकर


युती हवी कोणाला? आमचे मत फक्त मोदी, फडणवीस यांच्या कामगिरीला! आम्ही ठाणेकर


युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा! आम्ही ठाणेकर




शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने कालच घेतला होता. मात्र स्थानिक पातळीवर या युतीला स्पष्ट विरोध होत असल्याचं दिसून येतं आहे.



दरम्यान राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.