मुंबई :  भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचा ट्विटद्वारे पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे.  ग्रीन एकर्स रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा 200  वेगवेगळे स्टार्ट अप्स करणाऱ्या 'गबरू जवान' ची गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा, असे ट्विट केले आहे.  या ट्विटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये या अगोदर  म्हटलं होते. 


प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, दारूपासून ते चड्डी विकण्याचा धंदा करणाऱ्या ग्रीन एकर्स रिसॅार्टचा अभ्यास सुरू आहे. गबरू जवानच्या या बिझनेस मॅाडेलमध्ये 2007 ते 2012 पर्यंत महाराष्ट्र स्टेट को ॲाप बॅंकेला हजार कोटींचे नुकसान झाले आहे.   याच बॅंकेन गबरू जवानला करोडो रूपयांच लोन दिले आहे. 50 कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला. याच कारखान्यानं परत 150 कोटी रूपयांच कर्ज घेतले. HDIL- PMC बँक आणि पत्रा चाळ घोटाळ्यात गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे हे ही लवकरच कळेल, असे म्हणत  मोहत कंबोज यांचा ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटच्या मालिकेमुळे हा गबरूजवान नेता नेमका कोण?  ग्रीन एकर्स रिसॅार्ट चौकशी होणार का? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.






 ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार (Rohit Pawar) हे या कंपनीचे संचालक होते. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar)  हे देखील 2006 ते 2009 पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान (Rakesh wadhwan) यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत आणि याचदृष्टीनं ईडीचा तपास सुरु आहे. 


सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी


मोहित कंबोज यांनी 2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे," असा उल्लेख आहे. सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव आलं होतं. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्ट केलं होता. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, "या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही."