रायगड : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 338 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगड किल्ल्यावर शिवस्मारक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


हजारो शिवभक्त काल रात्रीपासून रायगडावर दाखल झाले आहेत. शिवस्मारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र हा कार्यक्रम शिवस्मारक मंडळाचा असून याच्याशी आपला कोणताही वैयक्तिक संबंध नाही, असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलं.

संबंधित बातमी :

अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण