शक्तीशिवाय काहीही अशक्य, भागवतांकडून सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 12:58 PM (IST)
नागपूर : जगात कुठलीही गोष्ट शक्तीच्या वापराशिवाय शक्य नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं आहे. इतके दिवस आपण शक्तीच्या भाषेचा वापर करत होतो, तेव्हा अमेरिका आपल्याला शांत बसवायची. मात्र आता त्यांना न विचारता आपण शक्तीचा वापर केला तर अमेरिकाही आपल्या पाठीशी असल्याचं भागवतांनी म्हटलं. एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट, शक्तीच्या वापराशिवाय ती साध्य नसल्याचंही मोहन भागवत म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.