नाशिक : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्पा आज संपत असतानाच यात्रेला चोरांचं ग्रहण लागलं आहे. शनिवारी नाशिकमध्ये जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मेळाव्यातील गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याचं सामोर आलं आहे. या प्रकरणी दोघांना अंबड़ पोलिसांनी अटक केली आहे. यातील बिलाल खान मालेगावचा असून एक विठ्ठल जाधव हा बीडचा आहे. आज दुपारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.


मेळाव्यातील गर्दीचा फायदा घेत चोर आपल्या खिशातिल पैसे चोरत असल्याचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या लक्षात आले. पैसे चोरत असतानाचं दातीर यांनी चोराला रंगे हात पकडून अंबड़ पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना समोर आल्यानंतर आणखीन चार ते पाच जणांचे मोबाईल आणि रोख रक्कम गेल्याचं समोर आलं. मात्र त्यातील फक्त रामदास आहिरे या पदाधिकाऱ्याने 26 हजार रुपये चोरी केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Aaditya Thackeray | नव महाराष्ट्रासाठी जनआशीर्वाद हवेत, आदित्य ठाकरेंचं आवाहन | ABP Majha



दरम्यान ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केलं, त्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही यात्रा आयोजित केली आहे. जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न आदित्य करतील.

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवट होणार आहे. आज यात्रा शिर्डी, श्रीरामपूर मध्ये असणार आहे. काल चांदोरीच्या कुलस्वामिनी लॉन्समध्ये आदित्य यांचा विजय संकल्प मेळावा पार पडला. आपण काढलेली यात्रा किलोमीटर मोजण्यासाठी नाही तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी काढल्याचं आदित्य यांनी म्हटलंय. तसेच दुष्काळमुक्त, समृद्ध असा नव महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असल्याचा आशावादही आदित्य यांनी व्यक्त केला आहे.

Aditya Thackeray | दिशा पाटनीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार, आदित्य ठाकरेंनी जोडले हात | ABP Majha


संबंधित बातम्या

मुंबईत येत्या काळात 500 इलेक्ट्रीक बेस्ट बस सुरु होणार : आदित्य ठाकरे


डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी!


"मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे


माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे