रत्नागिरी: भोंग्याच्या भूमिकेवर आवाज उठवल्यानंतर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना परदेशातून धमकी आली आहे. या धमकी प्रकरणी त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महाआरतीच्या आयोजनानंतर त्यांना ही धमकी आली होती.  


मनसेने मशिदीवरील भोंग्या प्रकरणी राज्यात अल्टिमेटम दिला होता. त्याच अनुषंगाने बुधवारी खेडमध्ये मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी महाआरतीचं आयोजन केलं होते. ही महाआरती झाल्यानंतर त्यांना परदेशातून फोन आला. त्यामध्ये 'भोंग्याचा मुद्दा सोडा अन्यथा तुम्हाला बघून घेतो' अशा प्रकारची धमकी दिली आहे. याच प्रकरणी वैभव खेडेकर यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे?
मशिदीवरील भोंग्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक असून धार्मिक नाही असे म्हणत मला दंगल भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत भडकवली असती असे राज ठाकरे यांनी म्हटले.


मशिदींवरील भोंग्याप्रश्नी राज ठाकरे म्हणाले की, हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा? असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांततेत सांगतो, तर पोलिसांनी आणि सरकारने ऐकून घ्यावं असं आवाहनही राज ठाकरे यांनी केले.


महत्त्वाच्या बातम्या: