Raj Thackeray MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगा या विषयाकडे लक्ष वेधलेय. आता राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केलेय. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तसेच पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेय. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय. 


राज ठाकरेंची भूमिका काय?
मशिदीवर किंवा अन्य ठिकाणी जे भोंगे लावले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला त्रास होतो. भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. हा फक्त मशिदीवरील भोंगे असा विषय नाही. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये.  एक, दोन दिवस आपण समजू शकतो मात्र, 365 दिवस जर या गोष्टी सुरु असतील तर ते योग्य नाही. आम्ही आमच्या कानाला का त्रास करुन घ्यायचा. म्हणून हा विषय थांबला पाहिजे. एकाच धर्मियांना बंधने सांगणार का तुम्ही? असा सवालही त्यांनी केला. भोंग्याचा त्रास हा फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिम बांधवांना देखील होतो. घरात लहान मुले, महिला असतात, वयस्कर लोक असतात, अभ्यास करणाऱ्या मुलांना याचा त्रास होतो. 


पत्रात काय म्हटलेय?


माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, 
मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात गातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय़ आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. 


तुम्ही एकच करायचं आहे - माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. 


मला खात्री आहे; जा्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.