कोल्हापूर: राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम हे आमने-सामने असून त्यांचे भवितव्य मतपेठीत बंद झालं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,91,549 इतकं मतदान असून त्यापैकी 1,45,626 मतदान हे पुरुष मतदान असून 1,45,901 हे स्त्री मतदान आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळेपर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
कोल्हापूरची पोटनिवडणूक ही राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजपसाठी लिटमस टेस्ट असल्याचं सांगितलं जातंय. या निवडणुकीत जो काही निकाल येईल त्यावरच भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होईल. भाजपच्या वतीनं या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला असून या निवडणुकीत त्यात किती यश मिळतंय याकडे लक्ष आहे. त्या आधारेच भाजपची आगामी निवडणुकीची तयारी आणि त्यातील मुद्दे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री पाटील आणि भाजपचे सत्यजित कदम हे आमने-सामने आहेत.
भाजपचा केवळ विजय नाही तर मोठ्या मताधिक्क्यानं विजय होणार, नागरिकांनी खूप विचार करून मतदान केले आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीत आम्ही सगळे प्रयत्न केले, अंबाबाई काय निर्णय देते पाहूया असं म्हणत त्यांनी कोल्हापूरमधील सर्व मतदारांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sambhaji Raje Chhatrapati : 3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार : खासदार संभाजीराजे
- PHOTO : उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या मतदानातील क्षणचित्रे
- Kolhapur North Bypoll : 'हमें किसी ने टोका तो छोडेंगे नहीं', सतेज पाटलांच्या घरासमोरील बुथवर चंद्रकांत पाटलांकडून स्लिपचं वाटप