मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह झाले आहेत. मागील काही दिवसात राज ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरही एंट्री घेतली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पहिलंवहिलं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता फेसबुकसोबतच ट्विटरवरही राज ठाकरे अॅक्टिव्ह झाले आहेत.

राज ठाकरेंचं पहिलं ट्वीट


राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील सरकारवर निशाणा साधत आहेत. आपली ही व्यंगचित्र ते त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर नियमित अपलोडही करतात. त्यावर त्यांना भरघोस प्रतिसादही मिळतो. त्यामुळे आता राज ठाकरे फेसबुकसोबत ट्वीटरवरही अॅक्टिव्ह झाले आहेत.

ट्विटरवर राज ठाकरे यांचे @RajThackeray असे ट्विटर हँडल असून, ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे. सध्यातरी राज ठाकरे कुणालाही फॉलो करत नसून, त्यांचे फॉलोअर्स मात्र वेगाने वाढताना दिसत आहेत.

एमएनएस अधिकृत या मनसेच्या अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्या ट्विटर एन्ट्रीची माहिती देण्यात आली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांसह अनेक ट्विटराईट्सनी राज ठाकरेंच्या अकाऊंटवर उड्या घेतल्या.

संबंधित बातम्या :

फेसबुकनंतर राज ठाकरेंची ट्विटरवरही एन्ट्री