मुंबई : कोकण विधानपरिषद निवडणुकीत भाजप युतीचा धर्म पाळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणात शिवसेना विरुद्ध नारायण राणे विरुद्ध तटकरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
भाजप कोकण विधानपरिषदेची जागा लढवणार नाही. भाजपकडून कोकणची जागा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला देण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फोन करुन दिली.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाची चाचपणी सुरु आहे.
कोकणात यापूर्वीच शिवसेनेच्या राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ही जागा तटकरे कुटुंबीयांपैकी एखादा सदस्य ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तटकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.