Raj Thackeray on Konkan Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्याची सुरुवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन घेऊन करणार आहेत. राज ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक प्रकल्प हा गुजरामध्येच का जातो? असा सवाल उपस्थित केला. 


राज ठाकरे यांनी सांगितले की, आजची बैठक पक्षाच्या इतर संघटना आहेत त्यासंदर्भात आहे. गेली बरीच वर्ष संघटना काम करत आहेत. यासंघटनांमध्ये काम करताना काही समस्या असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात आजचीही बैठक आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला होणार आहे. मेळावा झाला की, 28 तारखेला मी कोकण दौऱ्यावर  जाणार आहे. 


राज ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला 


राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि मला वाटतो तो संपूर्ण देशासाठी असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिकडच्या लोकांना आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यांवर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प जर राज्याराज्यांमध्ये गेले, तर संपूर्ण देशाचाच विकास होईल.


आजही महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत इतर कोणत्याही राज्यांहून पुढे आहे. नेहमीच महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिलं आहे उद्योगधंद्यांच्या बाबतीत. उद्योजकांनाही महाराष्ट्र हेच त्यांचं प्रथम क्रमांकाचं राज्य असल्याचं वाटत आलेलं आहे. त्यामुळे असं नाही गुजरातमध्ये प्रकल्पांसाठी अनुकूल सोयीसुविधा आहे आणि महाराष्ट्रात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास करण्याच्या हेतूनं प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.", असंही राज ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या