मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटबंदीसंदर्भात मनसेने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने मनसेचे अखिल चित्रे यांनी ही याचिका दाखल केली आहे. हायकोर्टात या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
बँका जुन्या नोटा बदलून देताना 2000 रूपयांची नोट देत आहेत. त्याचे सुट्टे पैसे मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. किमान दारीद्र्य रेषेखालील लोकांना नोटा बदलून देताना 10, 20, 50, 100 अशा स्वरूपात नोटा बदलून द्याव्यात, असं याचिकेत म्हटलं आहे.
सर्व सरकारी, निम सरकारी विभागात गरिबांसाठी सुट्या पैशांची व्यवस्था करावी. राज्य सरकारने किमान काही दिवस दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.